भुसावळचा पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचार्‍याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

 

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गणेश पोपटराव गव्हाणे ( रा. जामनेर ) हे तालुका पोलीस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोड म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली होती. यामुळे सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीचे  उप अधिक्षक शशिकांत पाटील यांनी पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पथकाची निर्मिती केली.

 

या पथकाने आज सापळा रचला. आज भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर गावाजवळ गणेश गव्हाणे यांनी सहा हजार रूपये स्वीकारतांना या पथकाने रंगेहात अटक केली.

Protected Content