भांडण सोडल्याच्या कारणावरून तरूणाला फायटरने बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील बसस्थानक परिसरात भांडण सोडल्याच्या कारणावरून तरूणाला फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी शनिवार ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश विष्णू गव्हाणे (वय-२४) पिंपळदरी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे दोन जणांचे भांडण सुरू होते. त्यावेळी अंकुश गव्हाणे याने भांडण सोडविले. याचा राग आल्याने तोंडापूर गावातील विशाल फुलचंद भिमरोट आणि गोपाल फुलचंद भिमरोट यांनी फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत झाली. अंकुशने जखमीअवस्थेत पहुर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ४ मार्च रोजी दुपारी १ वाजता पहुर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विशाल फुलचंद भिमरोट आणि गोपाल फुलचंद भिमरोट दोन्ही रा. तोंडापूर ता.जामनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.

Protected Content