ब्रेकिंग : नकली नोटा छापणाऱ्या एकाला अटक: युट्यूब वरून पाहून घरात छापल्या नकली नोटा

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । युट्यूब वरून पाहून घरात भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या संशयताला  पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देविदास पुंडलिक आढाव (वय-30, रा. कुसुंबा तालुका जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी देविदास आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी कारवाई केली. एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून नकली नोटा वापरात बाजारात देत असल्याची खात्रीलायक सूचना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव (वय-३०, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) याला रंगेहात पकडून अटक केली. त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवी जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्याची चौकशी केली असता युट्युबवर नोटा छापण्याचे पाहून या नकली नोटा छापल्या आहे, असे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार १ मार्च रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content