यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे घाटाजवळच्या रस्ता लुट प्रकरणात चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून यात एका अल्पवयीनाचाही समावेश आहे.
यावल-भुसावळ रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येत असलेल्या येथील अजय रमाकांत मोरे (वय २७) या युवकाची दुचाकी अंजाळे घाटाजवळ चार अज्ञात चोरट्यांनी रोखत त्यास पिस्तूलाचा धाक दाखवून व त्याला मारहाण करत त्याचे कडील दुचाकीसह हातातील मोबाईल हिसकावून पसार झाले झाले होते.
या प्रकरणी पोलीसांनी वेगाने तपास करीत या गुन्ह्यातील सर्व चार संशयीतांपैकी करण रमेश पवार(२२) आणि विक्की अंकुश साळवे(२०) दोन्ही रा. आसोदा या दोन संशयितांना सोमवारीच मध्यरात्री नंतर पोलीसांनी अटक केले होते. यानंतर मंगळवारी रात्री असोदा ता. जळगाव येथील प्रेम उर्फ सुरज पुना राठोड वय २१वर्षे यास अटक केली असून त्याचे कडून गावठी कट्टा जप्त केला आहे. प्रेम राठोड यास बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्या.एस एम बनचरे यांनी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, याच प्रकरणात अन्य चवथा संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्यास बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान, पोलीस नाईक भुषण चव्हाण हे करीत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.