बोरींगचा पाईप बाहेर लावण्यावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाईक बोरींगचे पाईप कम्पाऊंडच्या बाहेर लावण्याच्या कारणावरून हरिविठ्ठल नगरातील महादेव मंदीराजवळील एका महिलेला दोन जणांनी अश्लिल शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार १५ जून रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पुतलाबाई रमेश पवार (वय-५०) रा. महादेव मंदीराजवळ हरीविठ्ठल नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या घराच्या बाजूला राहत असलेल्या संगिता कैलास निकम आणि कैलास निकम यांनी ८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सामाईक बोरींगचे पाईप कम्पाऊंडच्या बाहेर लावण्याच्या कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच दोघांनी महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर सात दिवसांनी गुरूवार १५ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संगिता कैलास निकम आणि कैलास निकम दोन्ही रा. महादेव मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Protected Content