बंद घराचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

पहूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथे एकाचे बंद घराचे कुलूप तोडल्याच्या कारणावरून पुतण्याकडून काका व काकूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी १२ मे रोजी रात्री ८ वाजता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर शामराव घाटे (वय-५३)  रा. पहूर पेठ ता. जामनेर हे आपल्या पत्नी रत्ना याच्यासोबत नोकरीनिमित्त शहादा जि. नंदूरबार येथे वास्तव्याला आहे. किशोर घाटे यांचे पहूर पठे येथे वडीलोपार्जीत घर आहे. सध्या सुट्ट्या असल्याने किशोर घाटे हे पत्नीसह पहूर पेठ येथे १२ मे रोजी आले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. या कारणावरून पुतण्या शैलश विजय घाटे व त्याचा मित्र यांनी दारू पिऊन किशोर घाटे व त्यांची पत्नी रत्ना घाटे या दोघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसचे जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर किशोर घाटे यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content