पिकांची वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यात ओलिताची व्यवस्था असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे विविध भागात पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु हरण,रोही, रानडुक्कर या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी वैतागलेला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी आटोपलेली असून पिकांची वाढ देखील होत आहे. यावर्षी पाऊस लांबणीवर पडलेला आहे त्यामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे परिणामी वन्य प्राण्यांचा मोर्चा शेती शिवाराकडे वळलेला आहे. जंगलातील वन्यप्राणी हरण ,रोही, रानडुक्कर शेती शिवारामध्ये रात्रंदिवस शिरकाव करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणाऱ्या नुकसानीमुळे मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून मागील वर्षीचा कापूस भावा अभावी अजून विकला गेला नसून ७०% शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडलेला आहे व त्यातच हा वन्य प्राण्यांचा हरण, रोही, रानडुक्कर यांच्या हैदोसाकडे वन विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना दिवसभर मेहनत करून पिकांची राखणदारी करण्यासाठी रात्रभर शेतात मुक्कामी राहावे लागत आहे.

त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत असून रात्री अपरात्री सर्पदंश, रानडुकरांचे हल्ले या घटनाही घडत असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जीवावर उदार होऊन पिकांचे रक्षण करावे लागत आहे.शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती भरलेली दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम व पैसे वाया जात आहे.वन विभागाने ज्याप्रमाणे वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाईची रक्कम ही पीक पूर्ण वाढल्यावर पंचनामे करून देतात त्याच प्रकारे नवीन लागवड केलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर कंपाऊंड देण्यात यावे व नैसर्गिक आपत्तीसह बाजारभावाच्या चढा-उतारामुळे हतबल झालेले शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मनगटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content