पाथरवट समाजातर्फे विश्वकर्मा जयंती उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील पाथरवट समाजाच्या वतीने भगवान विश्वकर्मा जयंती काल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

जळगाव महापालिकाच्या वतीने सन २०११ मध्ये पाथरवट समाज विकास मंडळाला शहरातील कांचन नगरात सहा हजार स्क्वेअर फुट जागा देण्यात आलेली आहे. त्या जागेवरच भगवान विश्वकर्मा व साईबाबाचे भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे. दरम्यान या संपूर्ण परिसराला आमदार निधीतून वॉल कंपाउंड बांधून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार शराजूमामा भोळे यांनी दिले आहे. याप्रसंगी समाज बांधवांनी भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार भारती रवींद्र (पाथरवट) यांनी अकरा हजार रुपये, जयश्री प्रसाद रणदिवे यांनी पाच हजार रुपये, ॲड. निर्मला परचुरे यांनी दहा हजार रुपये असे देणगी स्वरूपात रक्कम दिली. तत्पूर्वी यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. संध्याकाळी काल्याचे किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र सुभानराव काळे, संदीप अरुण डोलारे, राजेंद्र काळे, प्रकाश रणदिवे, चंद्रशेखर काळे, संजय दिनकर काळे, प्रल्हाद लोहकरे, रमेश रणदिवे, अमोल धडे, प्रकाश नागापूरकर, प्रवीण सूर्यवंशी, ललित काटकर, सचिन राणे, निलेश राणे, शिवाजी लोहकरे, महेंद्र नागपुरे, सनी काळे, अविनाश काळे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content