पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्य शासनामार्फत १५ एप्रिल २०२३ ते १५ जुन २०२३ या कालावधीत “शासकीय जत्रा योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची” हा उपक्रम राबविण्यात येत असून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची पाचोरा – भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार प्रविण चव्हाणके, तहसिलदार मुकेश हिवाळे (भडगाव) गटविकास अधिकारी अतुल पाटील, सी. एम. वाघ, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. सतीष टाक, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुजाता सावंत उपस्थित होते. या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून मातोश्री पांदण रस्ते व शेत रस्त्याचे कामे होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाखा अभियांत्याना चांगलेच धारेवर धरले. तर पाचोरा व भडगाव तालुका गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीन झोनमध्ये असून विहिरींची योजना बंद असतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जवाहर विहीर योजनेचे २५ ते ३० हजार रुपये घेतले वर्क ऑर्डर कशा दिल्या या बाबत पाचोरा व भडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना विचारणी केली तर रस्ते मंजूर असतांना उपभियंते कामास का सुरुवात करीत नाही असे विचारले असता एका शाखा अभियांत्याने रस्त्याचे इस्टीमेंट मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या एक महिला अधिकारी पैशासाठी मागणी करत असल्याचे सांगितले. यावर आमदार किशोर पाटील अधिकच संतापले.

“शासकीय जत्रा योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जाणार असल्याने यात पंचायत समिती मार्फत घरकुल योजना, गोठा शेड, विहीर पुनर्भरण, शेतरस्ते, समाज कल्याण विभागातर्फे महिलांसाठी योजना, नगरपरिषदे मार्फत, घरकुल योजना, बचत गटांसाठी योजना, पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी मेंढी पालन, गाई म्हशी पालन योजना, कृषी विभागाच्या ठिबक सिंचन, फळबाग लागवड, शेततळे, सह पाणी पुरवठा योजना, शिक्षण, महिला बालविकास, वन विभाग, आरोग्य विभाग, विज वितरण कंपनीच्या विविध योजना, राबविल्या जाणार आहे. या योजनेचा प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहचविण्यासाठी आराखडा तयार करून त्याची २० मे पर्यंत पुर्तता करुन २० मे नंतर एका भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करुन पाचोऱ्यात दोन किंवा तीन मंगल कार्यालयात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
यांची होती उपस्थिती
बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, पदमसींग पाटील, संजय पाटील, विकास पाटील, गणेश भिमराव पाटील, आर. एफ. ओ. अर्षद मुलाणी, सांगायचे नायब तहसीलदार बी. डी. पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता श्री राठोड, पुरवठा अधिकारी अभिजित येवले, महिला बालविकास अधिकारी जिजाबाई राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, पोस्ट मास्तर राजेंद्र पाटील, नगरपालिकेचे दगडू मराठे, आर. जे. चव्हाण, एम. ओ. काजवे, चंद्रकांत पाटील, बी. बी. पाटील, बोरसे, सह मोठ्या प्रमाणात विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रोसिडींग अमोल भोई यांनी लिहिले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.