नराधमाने स्वत:च्या मुलीवरच केला अत्याचार !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिनावल गावातल्या एका नराधमाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना रावेर तालुक्यातील चिनावल येथे घडली आहे. चिनावल येथे १३ वर्षीय शिक्षण घेत असलेल्या मुलीवर जन्मदात्यानेच दिनांक २१ मे रोजी सकाळी आठ वाजे सुमारास फिर्यादी ही भांडे धुत असताना घरात येवुन फिर्यावर अत्याचार केला

 

या प्रकरणी संबंधीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस  निरीक्षक  जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक  विनोद खांडबहाले हे करत आहेत.

Protected Content