धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील तरुण रेल्वेखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेडहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण पितांबर मोरे-भिल (वय २०, रा. मोहाडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण मोरे हा मोहाडी गावामध्ये आई-वडील लहान भाऊ आणि बहिणीसह राहतो. प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. प्रवीण भिल याचा मागील महिन्यात साखरपुडा झालेला आहे.  मंगळवारी रात्री तो मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ गेला होता. तेथे खंबा नंबर ४२९/१२, डाऊन लाईन जवळ रेल्वे खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

रेल्वे विभागाने बुधवारी मध्यरात्री दीड वाजता कळवल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या दुचाकी मुळे त्याची ओळख पटली. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी आणि गावातील नातेवाईकांनी आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी अनिल फेगडे आणि अनिल मोरे करीत आहेत.

Protected Content