धरणगावात मुस्लिम वेल्फेअर सोसायटीतर्फे सामूहिक विवाह

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी यांनी सुद्धा प्रथमताच सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. १४ मे रविवारी हा विवाह सोहळा धरणगाव येथील भडंगपुरा मस्जिद ग्राउंडवर संपन्न झाला. या विवाहात एकूण सात जोडप्यांचा विवाह पार पडला.

जळगाव जिल्हा मानियार बीरादरी तर्फे सर्व वधू यांना ५० गृहपयोगी भांड्यांचा किचन सेट, मलिक परिवारातर्फे सर्व वधूंना स्टीलचे कपाट, सालार परिवारातर्फे पलंग अशा प्रकारे जळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मानसिक पाठबळ सोबत आर्थिक पाठबळ दिल्याने हा विवाह सोहळा अत्यंत साध्या व घरगुती पद्धतीने पार पडला.

यांचे झाले विवाह
चोपड्याच्या मिर्झा हिना सोबत शेख तौसीफ सोबत समीनाबी सोबत मिर्झा शोएब
धरणगावची मुस्कान शेख सोबत कासोद्याचे शेख अहमद
धरणगावची रहिमाबी सोबत धरणगावचा शेक याकूब
सुरतची सानिया पठाण सोबत भुसावळचे शेख अख्तर
जळगावची हिनाबी सोबत अंमळनेरचे इम्रान खान
पालधीची शबनमबी सोबत पारोळ्याचे सैय्यद रियाजली यांचे लग्न पार पडले

या तरुणांनी घेतले परिश्रम
धरणगाव मुस्लिम वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष इरफान शेख, रियाजुद्दीन शेख, हाजी हाफीजोद्दीन, महबूब पठाण, अफसर शेख , नदीम काझी, करीम खान, सईद सय्यद, सय्यद इब्राहिम, सय्यद सज्जाद, नाईमअहमद, आसिफ शेख, अब्दुल बारी और रहमान शाह यांनी परिश्रम घेऊन या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

प्रमुख अतिथी उपस्थिती
या विवाह सोहळ्याला नववरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख गुलाब वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, इकरा एज्युकेशन सोसायटीचे करीम सालार, एटीएम चे अध्यक्ष एजाज मलिक, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख ,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उप कूलपती रफीक काझी, ईदगाह ट्रस्टचे अनिस शहा व ताहेर शेख,प्रा इक्बाल शाह,फारूक कादरी, कैलास वाणी तसेच पटेल आदींची उपस्थिती होती.

सदर विवाह सोहळा यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल मुस्लिम वेलफेर सोसायटी धरणगाव चे अध्यक्ष इरफान शेख यांचा फारुक शेख तर रियाज अली काजी यांचा एजाज मलिक व नदीम काझी यांचा गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content