कुंझर ग्रामस्थवासियांनी गाव पाणीदार करण्यासाठी घेतला पुढाकार

3abb0069 33da 4313 b5db 4f203c097f3e

चाळीसगाव (प्रतिनिधी) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांनी ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला असून यात कुंझर ग्रामस्थांनी जलसमृद्धीसाठी पुढाकार घेतला आहे. कुंझर ग्रामस्थ गाव पाणीदार करण्यासाठी पुढे सरसावले असून सामाजिक संघटनांना सोबत घेत श्रमदानात सहभागी झाले झालेत. सी सी टी बंधारा सुरु करीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची काम हाती घेतल्याने गावात जलसमृद्धी होणार असल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आजच्या श्रमदानातून दिसून आले.

 

 

शहरातील हिरकणी महिला मंडळ व युगंधरा फाउंडेशनच्या वतीने श्रमदानप्रसंगी कुदळ पावडी आणि घमेले साहित्याचे वितरण करण्यात येवून श्रमदान करण्यात आले. तालुक्यातील पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावापैंकी कुंझर येथे जलसंधारणाचे मोठया प्रमाणात कामे सुरु करण्यात आले असून या कामांसाठी शहरातील सामाजिक संघटनासह बचत गटातील महिला सदस्यांनी सहभाग घेतला यात पाणी फाउंडेशनमार्फत श्रमदानातून जलसंधारणाची अनेक छोटी कामे घेण्यात आलीत. नाला खोलीकरण,मातीनाला बांध,शेततळे इत्यादी कामे करण्यावर भर देणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

 

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ग्रामस्थांशी व सामाजिक संघटनांशी समन्वय साधून महाश्रमदानातून सी सी टी चे काम जवळ जवळ पूर्ण झाले असल्याचे समाधान मिळाल्याचे चंद्रशेखर शिसोदे यांनी सांगितले. तर ग्रामस्थांनी यात हिरीरीने सहभाग घेत मोठ्या जोमाने जलसंधारणेची कामे हाती घेतली आहेत. यात नाला खोलीकरण,शेततळे तयार होणार असल्याने परिसर सुजलाम होणार आहे, असे सुचित्रा पाटील यांनी सांगितले. आज सर्वत्र शेतकरी दुष्काळाला आणि उपासमारीला तोंड देत असून पाण्याच्या कमतरतेमुळे मानवनिर्मित संकट उद्भवले आहे. यात ग्रामस्थांनी दाखवलेल्या पुढाकाराने पावसाळ्यातील पाण्याने संजीवनी प्राप्त होणार असल्याने शेती समृद्ध होणार आहे, असे स्मिता बच्छाव यांनी सांगितले.

 

 

यावेळी हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, नगरसेविका सविता राजपूत, कुंझरचे माजी सरपंच नरसिंग पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, वरखेडे ग्रा.पं.सरपंच अर्चना पवार,दिपक कच्छवा, निखील राजपूत, अनिता शर्मा, वैशाली काकडे, छाया पाटील आदींनी सहभाग नोंदविला. तर ग्रामस्थांनी मोहीमेत सहभागी होता. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठीचा विडा उचलल्याचे दिसून आले.

Add Comment

Protected Content