दुदैवी घटना : पाण्यात हौदात बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ५ वर्षांचा मुलगा हौदात बुडून मरण पावल्याची घटना मंगळवारी २० जून रोजी रात्री ८ वाजता समोर आली आहे.  या घटनेबाबत वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  अर्णव हेमेंद्र बडगुजर (वय, ५, रा. सरस्वती नगर, वरणगाव ता. भुसावळ) असे मयत बालकाचे नाव आहे.

 

याबात अधिक माहिती अशी की, अर्णवचे वडील हेमेंद्र हे भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत ११ वर्षापासून शिपाई पदावर कार्यरत आहेत. हेमेंद्र बडगुजर मुळचे दोंडाईचा येथील असून ते वरणगावात पत्नी, दोन मुले यांचेसह राहतात. मंगळवारी २० जून रोजी सांयकाळी ७ वाजेदरम्यान परिवारातील सदस्यांनी जेवण केल्यानंतर हेमेंद्र बडगुजर यांचा पाच वर्षीय लहान मुलगा कर्णव हा लगतच्याच मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, अर्धा तास झाला तरीही कर्णव घरी न आल्याने आई – वडील व भावाने त्याचा परिसरात शोध घेतला.

 

मात्र, तो आढळून न आल्याने त्याचा शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शोधले. नंतर बडगुजर यांच्या घराबाहेरच जमिनीत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात शोध घेण्यात आला. तेथे कर्णव हा पाण्याच्या हौदात आढळून आला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्याला मयत घोषित  करण्यात आले. यावेळी कर्णवच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कर्णव हा शहरातीलच सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूल मध्ये सिनीयर केजी मध्ये शिक्षण घेत होता. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content