दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडणार्‍या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणार्‍या आयशरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना नशिराबाद उड्डाणपुलावर घडली होती. या अपघातात दीपक बाबुराव कोळी व त्यांची पत्नी शितल दीपक कोळी दोघ रा. सामरोद ता. जामनेर यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूर ठरलेल्या आयशर चालक सलमान मेहबुब रा. ढकोली पी.एस.आको दा. जि. बुंलदशहर यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालकाला मुलगा झाल्याने त्याला बघण्यासाठी दीपक बाबुराव कोळी व त्यांची पत्नी शितल दीपक कोळी दोघ रा. सामरोद ता. जमानेर हे शुक्रवारी २३ जून रोजी (एमएच १९ एए २०९५) क्रमांकाच्या दुचाकीने असोदा येथे आले होते. शनिवारी २४ जून रोजी सकाळच्या सुमारास ते नशिराबादमार्गे जळगावकडून जामनेरकडे जात असतांना नशिराबाद उड्डाणपुलावर (एचआर ७४ बी ४२४२) क्रमांकाच्या आयशर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जात होता. त्या आयशरने कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आयशर चालक सलमान मेहबुब याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पुढील तपास पोहेकॉ नूर खान हे करीत आहे.

Protected Content