दुचाकीला आयशरने उडविले : दाम्पत्याचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथे महामार्गावर आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी घडली आहे.

 

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एमएच १९ एए २०९५ क्रमांकाच्या दुचाकीला भरधाव आयशरने उडविले. नशिराबादजवळ असलेल्या महाजन हॉटेलच्या जवळ हा अपघात घडला. या भीषण अपघातात शेनफडू बाबूराव कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) आणि भारतीय शेनफडू कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने त्यांचा रूद्र हा तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे.

 

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत शेनफडू कोळी हे नशिराबादमार्गे जामनेर आणि सामरोद येथे जात असतांना त्यांच्यावर काळाने झडप मारली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content