दिग्गज फोटोग्राफर मेहमूद अमन काळाच्या पडद्याआड

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या छायाचित्रांनी देश-विदेशात ख्याती अर्जीत केलेले दिग्गज छायाचित्रकार मेहमूद अमन यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छायचित्रकार म्हणून मोठा लौकीक असणारे मेहमूद अमन यांनी काल अखेरचा श्‍वास घेतला. ते भुसावळ केबल नेटवर्कचे संचालक सलीमभाई व न्यूज १८ लोकमतचे पत्रकार इम्तियाज अहमद यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content