थोरगव्हाणच्या तरूणाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबियांचा आक्रोश !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील थोरगव्हाण या गावात एका विवाहीत तरूणाने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी , वसंत जानकीराम पाटील (वय ३५ वर्ष राहणार थोरगव्हाण ) यांनी दिनांक १२ जुन रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्यावे गळफास घेत आत्महत्या केली आहे. मयताचे काका आत्माराम बाबुराव पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी केले. यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर भावविवश झाला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी हे करीत आहे .आत्महत्या केलेला तरूण वसंत पाटील यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुली असून त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content