तरूणीवर जबरी अत्याचार; एकाला अटक

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर एकाने जबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका झोपडपट्टी भागामध्ये २० वर्षीय तरूणी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास  तरुणीही शौचालयाला जात असतांना गावात राहणारा सागर सुरेश शिंदे (वय-१८) या तरुणाने तिला जबरी हात पकडून खोलीत नेऊन तिच्यावरती जबरी अत्याचार केला. यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार १२ मे रोजी रात्री ११ वाजता पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर सुरेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दोनगहू यांनी संशयित आरोपी सागर शिंदे याला अटक केली आहे.

Protected Content