तरूणीची ३ लाख १५ हजारांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रताप नगरातील तरुणीच्या लॅपटॉप तेसच मोबाईलमधून पेटीएम आणि गुगल पे च्या खात्याची माहिती चोरुन त्याव्दारे ३ लाख १५ हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक वृत्त असे की, जळगाव शहरातीलल प्रताप नगरात अनुजा श्रेयांश रायसोनी (वय-२९) ही तरुणी राहते. तिच्याकडे असलेल्या लॅपटॉप तसेच मोबाईलमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटीएम वॅलेट व गुगल पे वरुन माहिती चोरली, व त्या माहितीच्या आधारे अनुजा हिच्या आयआसीआसीआय या तसेच एचडीएचफसी या दोन्ही बँकेच्या खात्यावर परस्पर ऑनलाईन पध्दतीने पैसे वळवून एकूण ३ लाख १५ हजार रुपयांत तिची फसवणूक केली. प्रकार लक्षात आल्यानंतर अनुजा हिने शनिवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

Protected Content