मोठी बातमी : पोलीसांच्या कारवाईत ६२ लाखांचा गांजा जप्त

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शेतात अवैधरित्या गांजाची शेती करून लाखो रूपये कमविण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे. एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारात गांजाची शेतीवर पोलीसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी ६१ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या  तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता हा गांजा  दरम्यान पोलिसांची कुणकुण लागताच दोन्ही संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content