डॉ. आंबेडकर उद्यानात स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती, प्लास्टिक बंदी, स्वच्छता ॲप याविषयी जनजागृती गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व  जळगाव क्लिन गृपतर्फे करण्यात आली.

 

यावेळी उपस्थित हास्य क्लबच्या सदस्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरित जळगाव’ च्या संकल्पनेत सहभागी होऊन स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.  याप्रसंगी मदन लाठी, हेमंत बेलसरे, रविंद्र नेटके, विशाल पाटील व हास्य क्लबचे अध्यक्ष अश्विन गांधी, सदस्य सुरेश सोनवणे आणि इतर सदस्य उपस्थित होते.

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधींनी ‘आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरवात करून, माझे घर, माझी गल्ली, माझा वार्ड, माझे शहर यातून स्वच्छ अभियानास महानगरपालिकेस सहकार्य करावे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. स्वच्छता ॲप विषयी माहिती देताना प्लास्टिक चा कमीत-कमी वापर करावा, प्लास्टिक विघटित होत नसल्याने त्याचा दूरगामी परिणाम होतो.’ असे मार्गदर्शन करण्यात आले. मदन लाठी तर्फे हास्य क्लबला आंबेडकर उद्यानासाठी ११ कडूनिंबाचे रोपे देण्यात आलीत. त्यांपैकी एका रोपाची हास्य क्लबचे अश्विन गांधी, सुरेश सोनवणे यांच्याहस्ते लागवड करण्यात आली. या रोपांची वृक्ष होईपर्यंत हास्य क्लब संगोपन करेल अशी ग्वाही हास्य क्लबच्या सदस्यांनी दिली. उपस्थित असलेल्या सदस्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन  ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या मोहिमेस सहभागी होण्यासाठी उत्साह दाखवला. आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाच नागरिकांची स्वच्छ परिसर कमिटी स्थापन करण्याची संकल्पना गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मांडण्यात आली त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Protected Content