ठाकरेंना पुन्हा धक्का ! आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात जाण्याची चर्चा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन तोंडावर असतांना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे या आज सकाळपासून नॉट रिचेबल झाल्या असून त्या शिंदे यांच्या गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासून त्यांचा फोन नॉट रिचेबलही झाला आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या पक्षाचा वर्धापन दिन असतांनाच ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसणार आहे.

 

आज सकाळीच माजी आमदार शिशीर शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत असल्याची घोषणा केली होती. या पाठोपाठ आता आमदार मनीषा कायंदे या देखील ठाकरे गटाला सोडणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content