जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरा, अन्यथा शाळांना कुलूप ठोकण्याच्या आमदारांचा इशारा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझ्या मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांसह इतर रिक्त पदे तसेच शून्य व एक शिक्षकी शाळा यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यामुळे तात्काळ रिक्त पदांचा भरणा करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद शाळांना कुलूप ठोकण्याचा गंभीर इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या पत्रात  दिला आहे.

 

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षण विभागात मराठी व उर्दू माध्यम मिळून गटशिक्षणाधिकारी १. शिक्षण विस्तार अधिकारी-३ (रिक्त-२), केंद्रप्रमुख-१० (रिक्त-८), ग्रेटेड मुख्याध्यापक ३० (रिक्त-८), पदवीधर शिक्षक – ५९ ( रिक्त-२३) उपशिक्षक – ३५५ (रिक्त-११५) असे एकूण ४५८ पैकी ३०१ पदे भरलेली असून १५७ पदे रिक्त असल्यामुळे आज रोजी मराठी माध्यमाच्या ६ शाळा विना शिक्षकांच्या आहेत. त्यातच मराठी माध्यमाच्या १७ या शाळा एक शिक्षकी आहेत.

 

तसेच बोदवड तालुक्यात मराठी व उर्दू माध्यम मिळून गटशिक्षणाधिकारी-१ (रिक्त -१), शिक्षण विस्तार अधिकारी-२ (रिक्त-१), केंद्रप्रमुख-५ (रिक्त-३), ग्रेटेड मुख्याध्यापक १३ (रिक्त-४), पदवीधर शिक्षक-३३ (रिक्त-१४) उपशिक्षक १७८ (रिक्त-४५) असे एकूण २३२ पैकी १६४ पदे भरलेली असून ६८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशी पदांची संख्या रिक्त असल्यामुळे माझ्या मतदार संघातील ग्रामीण भागातील गोरगरीब व शेतकल्प ची मुले शिक्षणापासून वंचित राहत असून हि रिक्तपदे तात्काळ भरण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी अन्यथा येत्या ५ ते ६ दिवसात मी स्वतः मतदार संघातील सर्व शाळांना टाळे ठोकणार याची नोंद घ्यावी अशा गंभीर इशारा त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण प्रशासनाला दिला आहे.

 

तसेच ना.दिपक केसरकर, मंत्री- शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, म. संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे जि. पुणे. म. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. जळगाव जि. जळगाव., म. सह संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग, नाशिक यांना माहिती स्तव प्रति पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच दिवसा १५ जून २०२३ पासून नवीन शालेय सत्रास सुरुवात झालेली असून काही वर्ग दुपारच्या सत्रात भरविले जात असल्याने त्यातच पाऊस लांबणीवर गेल्याने उन्हाचा पारा प्रचंड वाढत आहे. त्यामूळे नागरिकांसह अबाल वृद्धांचे प्रचंड लाही लाही होत असून दुपारच्या सत्रातल्या शाळा सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यान भरविण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जि. प चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली.

Protected Content