जामनेर बाजार समिती सभापतीपदी भागवत तर उपसभापतीपदी घोंगडे

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजमल भागवत तर उपसभापतीपी वासुदेव घोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक पार पडली असून या निवडणुकीमध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता आली आहे. दरम्यान, आज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती निवड करण्यात आली.

 

यामध्ये राजमल नामदेव भागवत यांची सभापती पदी तर वासुदेव पंडित घोंगडे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते एडवोकेट शिवाजी सोनार यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या सत्कार केला. यावेळी जितेंद्र पाटील, छगन   झाल्टे, रामेश्वर पाटील, श्रीराम महाजन, प्राध्यापक शरद पाटील, तुकाराम निकम यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content