जळगावात ठेविदारांचे अर्धनग्न आंदोलन

0
शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । प्रलंबित मागण्यासाठी बीएचआर ठेवीदार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला.

दिलीप सुरवाडे, सुधाकर पाटील, सरला नारखेडे, नामदेव भोळे, सोपान चौधरी, ललित नेहते, नीळकंठ राणे, रजनी भोळे, कस्तुराबाई चौधरी, प्रभावती मोमने, रत्नप्रभा नारखेडे, मनिषा चिरमाडे यांच्यासह शंभरावर ठेवीदारांनी या आंदोलनात भाग घेतला.

ठेविदारांनी या आंदोलनात विविध मागण्यात केल्या. या मागण्यांमध्ये बीएचआर पतसंस्वरील अवसायकाची बदली करून सक्षम अधिकारी नेमावा, ठेव पावत्यांची संपूर्ण व्याजासकट रक्कम परत करावी. भुसावळ पीपल्सवरील अवसायकाची नियुक्ती रद्द करावी. आसोद्यातील तीनही पतसंस्थांची कलम ८८ अंतर्गत चौकशी व्हावी, पतसंस्थांवरील खासगी अवसायकाची नियुक्ती रद्द करा, कलम ८८ च्या चौकशी शासन नियुक्त अधिकार्‍यांनी करावी, आदींचा समावेश होता. दरम्यान, मागण्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचाही इशारा ठेवीदारांनी दिला.

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!