सांगली : वृत्तसंस्था । । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वत:चे काहीही कर्तृत्व नसून निव्वळ आपल्या वडिलांच्या ठिकाणी त्यांनी अनुकंपा तत्वावर राजकारणात वाटचाल केली असल्याची खोचक टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने सरकारमधील विविध मान्यवर नेत्यांना टार्गेट करत आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. सांगली येथे पत्रकारांशी बोलतांना पडळकर म्हणाले की, जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली.
दरम्यान, जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राज्यात आहे. पण भविष्यात दिसेल की नाही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.