सरकारने बहुमत सिध्द करावे : शिंदे गटाचे राज्यपालांना पत्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारचा शिवसेनेच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी पाठींबा काढला असल्याने ठाकरे सरकारने आता आपले बहुमत सिध्द करावे अशा मागणीचे पत्र एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपालांना पाठविले आहे.

एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्यासह ३८ म्हणजेच एकूण ३९ आमदारांनी शिवसेनेचा पाठींबा काढल्याचा दावा केला आहे. यावर अद्याप सुनावणी सुरू असतांनाच शिंदे यांच्या गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र देखील पाठविण्यात आले आहे. या पत्रात शिंदे यांनी ठाकरे सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिध्द करावे अशी मागणी केली आहे.

आपण सरकारचा पाठींबा काढला असल्यामुळे उध्दव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलेला आहे. यावर आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यपाल या संदर्भात सरकारला बहुमत सिध्द करण्याचे निर्देश देऊ शकतात. तर शिंदे यांच्या गटाने आज अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

Protected Content