गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोरून एका तरूणाचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हरीष दिलीप खैरनार (वय-३०) रा. शिवाजी नगर, जळगाव हा तरूण पॅथॅलॉजीचे काम करतो. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच २५ व्ही १०७२) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोर त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. दुचाकी पार्क केल्यानंतर कामानिमित्त निघून गेला होता. अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरीष खैरनार यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १७ जून रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

Protected Content