गुलाबभाऊंचे सट्टा वरून वक्तव्य : चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव व बुलढाण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सट्टयाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

 

धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथील कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी  आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य केलं. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टिका केली आहे. मात्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

 

या संदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की, आम्ही ‘रिस्क’ घेतली. त्या ‘रिस्क’ ला गुलाबराव पाटील आम्ही ‘सट्टा’ खेळलो असं म्हटले. यामुळे त्यांच्या बोलण्यात काहीही गैर नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Protected Content