यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या यावल शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी पुरूषोत्तम साठे यांची तर उपाध्यक्षपदी सलीम तडवी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची सभा यावल येथील येथे खाजगी शिक्षक महासंघाचे जिल्हा सहसचिव सलीम इस्माईल तडवी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महासंघाच्या यावल तालुकाध्यक्षपदी पुरुषोत्तम दिनकर साठे, उपाध्यक्ष सलीम जमशेर तडवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सभेस जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय काकडे, तालुका सचिव खेमचंद खाचणे, सहसचिव शकील तडवी, प्रसिध्दी प्रमुख मोईन शेख, माजी अध्यक्ष आशिष बोरोले, सदस्य रोहित भालेराव, सुनील श्रावगी, अभिमन्यू पाटील, दिनेश इंगळे , मनोज करांडे, डॉ.जावेद शेख यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे महासंघाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.