खळबळजनक : अज्ञात तरूणाचा संशयास्पद मृदहेत आढळला !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह संशयास्पद मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या पाठीवर मारहाण केल्याचे दिसून येत आहे. पोलीसांनी मयत तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंजाळे तालुका यावल या गाव शिवारातील बुधवारी २१ जुन रोजी शिकलादेवी मंदीर फाट्यानजीक यावल ते भुसावळकडे जाणाऱ्या मार्गाच्या रस्त्यावरील डाव्या बाजुस असलेल्या चारीमध्ये वरील नमुद केल्याप्रमाणे अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळुन आलेला आहे. पोलीसांनी या तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. मयत तरूण हा अंदाजे ३० ते ४० वयोगटातील असून उंची ५ फुट ५ इंच, पांढऱ्या रंगाची नाईट पॅन्ट, केस काळे, शरीर बांधा मध्यम असून ओळखीचा असल्यास नातेवाईकांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे, राकेश मानगांवकर,पोलीस निरीक्षक, यावल पो स्टे मो नं . ८८८८८४१९८८, विनोद गोसावी, सपोनि , मो नं ७५८८५१६५५७. संदीप सुर्यवंशी, पो. ना , मो न. ८८३०४८२१४३ किशोर परदेशी, पो ना, मो.८९९९८७९९९५ अथवा यावल पोलीस स्टेशन-लेंडलाईंड क्रमांक ०२५८५-२६१३३३यावर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Protected Content