कॉमेडीस्टार विलासकुमार शिरसाठांचा अहिराणी ‘युवा प्रेरणा पुरस्कारा’ने गौरव

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथील खान्देश हित संग्रामच्या वतीने अभिनेता नकलाकार विलासकुमार शिरसाठ यांना त्यांच्या अहिराणी भाषेतील एकपात्री कॉमेडीच्या (मिमिक्री) योगदानाबद्दल राज्यस्तरीय अहिराणी युवा कवी संमेलना दरम्यान यंदाचा अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार देण्यात आला आहे. नाशिकच्या कवी नारायण सुर्वे सभागृहात कार्यक्रम झाला.

विलासकुमा शिरसाठ हे अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका तसेच हिंदी मराठीसह अहिराणीतील अनेक लाईव्ह स्टेज कार्यक्रम करत आहेत. त्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका, जिजामाता यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्या मुंबईतील मिमिक्री आर्टीस्ट अशोसिएशनचे सदस्य आहेत आणि कॉमेडी चॅम्पियन सुनील पाल यांचे ते शिष्य आहेत. यांच्यासह झुमका वाली पोरं फेम सिंगर भय्यासाहेब मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिरीयल आणि लोकमान्य सिरियल निर्माता अक्षय पाटील यांनीही सदर पुरस्कार देण्यात आला आहे. अहिराणी भाषा साहित्य संस्कृती येणाऱ्या तरुण पिढीमध्ये टिकून राहावी ह्याच उद्देशाने हा पुरस्कार या तरुण कलाकारांना देण्यात आला आहे. कार्यक्रमास स्वागताध्यक्ष गणेश पाटील, उद्घाटन ज्ञानेश्वर भामरे, कवी संमेलनाचे अध्यक्ष शरद धनगर अमळनेर, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुमित पवार, प्रा. प्रशांत पाटील, संग्रामसिंह राणा, समाधान सोनवणे, डॉ. एस. के. पाटील, भैय्यासाहेब पाटील, सुरेश पाटील, शशिकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित गौरव करण्यात आला.

Protected Content