केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच प्रोजेक्ट कॉम्पिटिशन घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.  इंटर्नल   क्वालिटी  अशु रन्स विभातर्फे हि स्पर्धा विभागनिहाय घेण्यात आली.

 

यामध्ये कॉम्पुटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती.  विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट हे समाजपयोगी कसे ठरतील आणि त्याचा उपयोग कसा वाढवता येईल या आधारावर  मूल्यांकन करण्यात आले.  परीक्षक म्हणून डॉ. के. पी. अकोले, डॉ. शुभांगी किरंगे, डॉ. एस. सी. कुलकर्णी आणि प्रो. डी. आर. तायडे यांनी काम पहिले.

 

इंटर्नल   क्वालिटी  अशु रन्स  विभागाच्या डॉ.  प्रज्ञा विखार यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. विभागातून उत्कुठ ठरलेले प्रोजेक्ट्स खालीलप्रमाणे आहेत-

 

१. कॉम्पुटर इंजिनीरिंग : प्रोजेक्ट चे नाव- आय. ओ. टी . बेस्ड मॅजिक मिरर  फॉर होम ऑटोमेशन. विद्यार्थी: मयुरी महाजन, तोषिका राणे, भावेश रोटे

२. इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग : प्रोजेक्ट चे नाव- आय. ओ. टी . बेस्ड स्मार्ट ऑटोमेशन सिस्टिम विथ कॅमेरा सर्विल्लेन्स – विद्यार्थी:  कुंदा  पाटील, तुशीता साळुंखे, हिमानी पाटील, चंद्राक्षा पाटील

३. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन इंजिनीरिंग  कुंदा – प्रोजेक्ट चे नाव- हेल्थ डिसीस प्रेडिक्शन सिस्टिम युसिंग मशीन लर्निंग अल्गोरिथम – विद्यार्थी: शिवानी मोतीरडे , उज्ज्वला रुले, जयश्री पाटील

४. मेकॅनिकल इंजिनीरिंग: प्रोजेक्ट चे नाव- फ्रॅब्रिकेशन ऑफ इलेक्ट्रिक कार विद्यार्थी: कुणाल चौधरी, गौरव लोखंडे, जयेश मोरानकर, वैभव लोखंडे

प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य प्रो. संजय दहाड, डीन रिसर्च डॉ. दिलीप हुंडीवाले  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  विभागप्रमुख प्रसाद कुलकर्णी, अविनाश सूर्यवंशी , राहुल पटेल आणि दर्शन ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Protected Content