किनगाव येथील नेहरू विद्यालयात एकाग्रतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील  किनगाव येथील नेहरू विद्यालयात शनिवार १७ रोजी आयुर्वेद कॉलेज संगमनेर येथील डॉ.योगिणीताई बियाणी (एम.डी) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी डाँ.बियाणी यांनी मुलांच्या एकाग्रतेसाठी (राजयोग मेडिटेशन)चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले यामुळे अभ्यासात लागणारी एकाग्रता मिळवता येते. त्याचप्रमाणे यशस्वी जीवन जगण्याच्या टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती असते. मेडिटेशनने ती दूर होते व आपला आत्मविश्वास वाढतो, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करणे, त्या करिता प्रयत्न करणे, सकारात्मकता स्वीकारून, नकारात्मक विचारांचा त्याग करणे, जीवनात मन, बुद्धी व संस्कार यांचे महत्त्व आहे. त्यामुळे शांती,प्रेम, आनंद, सुख, पवित्रता,ज्ञान आणी शक्ती हे अध्यात्माने मिळू शकते तणावमुक्त जिवन जगण्याकरिता आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करून जीवन यशस्वी करण्याबाबतही डाँ.बियाणी यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.के.पाटील यांनी शाळेच्या वतीने डाँ.योगीणी बियाणी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत सत्कार केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी.शिकोकार यांनी तर उपस्थितांचे आभार आर.डी.गवई यांनी मानले, या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content