यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते सद्दाम शाह खलील शाह यांची काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या रावेर लोकसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावल येथील खरेदी तालुका सहकारी विक्री संघाच्या सभागृहात २ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत सद्दाम शाह खलील शाह यांना जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांच्या शिफारसीने कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. सुभाषचंद्र गोडसे यांनी निवड केलेले रावेर लोकसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन व्यंकट चौधरी व केतन किरंगे , काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, यावल शहर काँग्रेसचे अध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, कोरपावली सरपंच विलास अडकमोल , काँग्रेस आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, यावलचे नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक समिर शेख मोमीन आणि कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल आदी उपस्थित होते. सद्दामशाह यांच्या निवडीचे पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.