Home राजकीय खिरोदा सरपंचपदी अरूणाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

खिरोदा सरपंचपदी अरूणाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

0
101


khiroda sarpach nivad

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खिरोदा येथे सरपंचपदाची निवड करण्यात आली. सरपंचपदी अरुणाबाई प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सरपंच पार्वताबाई महाजन यांनी नुकताच सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी एकमेव उमेदवारी अर्ज आलेल्या अरुणाबाई पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. या विशेष बैठकीला उपसरपंच गुलशान तडवी, ग्रा.पं.सदस्य सुनिल महाजन, संगीता महाजन, पार्वताबाई महाजन, आत्माराम पाटील, अतुल महाजन, शालुबाई सोनवणे उपस्थित होते. खरेदी विक्री संघ चेअरमन पी.आर. पाटील, वामन पाटील, सिताराम महाजन, विजय पाटील, सुरेश पाटील, सुभाष पाटील, रुबाब तडवी, वसंत पाटील, सतीष पाटील, नितिन पाटील, निवृत्ती पाटील, ग्रामसेवक भालेराव आदीनी नविन सरपंच पाटील यांचे अभीनंदन केले.


Protected Content

Play sound