उटखेडा येथून धान्य लंपास : चोरीच्या सत्राने ग्रामस्थ धास्तावले

रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर परिसरात चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे. उटखेडा येथून गोडाऊनचे कुलुप तोडून मध्ये ठेवलेले ६५ हजाराचे धान्य अज्ञात चोरटा चोरुन घेऊन गेला आहे.

 

या बाबत वृत्त असे सुनिल भास्कर पाटील ( रा उटखेडा ) यांच्या कुंभारखेडा रोड वरील गोडाऊन मधुन  दि१२ ते दि१३ च्या सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे कुलुप ५६ हजार रुपये किमतीचे ४० किलो वजनाचे ३५ धने कट्टे  तसेच नऊ हजार रुपये प्रमाणे ५० किलो वजनाचे १४ गहु कट्टे असे एकूण ६५ हजार रुपये किमिती उघड्यावर गोडाऊन मध्ये ठेवलेले गहु व धने चोरुन नेले आहे.

 

याबाबत सुनील पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरुध्द भादवी कलम ३८०,४६१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हवलदार सतीश सानप करीत आहेत.

Protected Content