टायर दुकानासमोरून दुचाकीची चोरी

चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील न्यू लक्ष्मी टायर दुकानासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पी.के. रदीश कृष्णनन वय ४८ रा. न्यू लक्ष्मी टायर, मालेगाव रोड चाळीसगा येथे वास्तव्याला आहे. पंचरचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ बीझेड ६०३६ ही दुकानासमोर पार्कींगला लावेलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हाप्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर रात्री ८ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content