भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थींनी आयटीएसई परिक्षेत समीक्षा महाजन जिल्ह्यात पहिली आली. तर एमटीएस परिक्षेत जिल्ह्यातून सहाव्या क्रमांकावर यश मिळविले आहे.
सेंट्रल प्रकाशन संस्था, कोल्हापूर आयोजित सन 2022- 23 मधील राज्यस्तरीय भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेचा (I.T.S.E)निकाल नुकताच जाहीर झाला. सन २००७-०८ या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व स्पर्धात्मक विकासासाठी सदर परीक्षेचे आयोजन राज्य स्तरावर केले जाते.
या परीक्षेत समीक्षा सुनील महाजन ही न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा शाळेची विद्यार्थिनी सातवीतून 300 पैकी २६४ गुण (८८%) मिळवत जळगाव जिल्ह्यातून पहिली आली. तसेच नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा(M.T.S) जळगाव च्या राज्यस्तरीय परीक्षेच्या निकालातही समीक्षा 200 पैकी 164 गुण(८२%) मिळवत पाचोरा तालुक्यातून दुसरी तर जळगाव जिल्ह्यातून सहावी आली होती. समीक्षा ही वाडे ता. भडगाव हे मुळ गाव असणारे पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे सुनिल दयाराम महाजन यांची कन्या आहे .तिला शाळेचे, पालकांचे व पुरुषोत्तम पाटील सरांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या यशासाठी समीक्षाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.