जळगाव प्रतिनिधी । जितेंद्र विसपुते यांच्या विरोधात चौकशी सुरू असतांना त्यांच्याकडे लघुसिंचन विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदाची धुरा सोपविण्याच्या निर्णयाविरूध्द काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी तक्रार केली आहे.
याबाबत वृत्त असे की, लघुसिंचन विभागात कार्यकारी अभियंता पदाचा पदभार दिलेले जितेंद्र विसपुते यांच्यावर तीन बंधार्याच्या कामासंदर्भात दोन मोजमाप पुस्तिका तयार करण्याच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. रत्नपिंप्री साठवण बंधारा, सांगवी साठवण बंधारा आणि टेहू येथील साठवण बंधार्याच्या कामाच्या दोन मोजमाप पुस्तिका नोंद केल्याप्रकरणी चौकशीमध्ये विसपुते यांच्यासह काही जण दोषी आढळून आले आहेत. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.बी.रणदिवे यांनी याबाबत २९ एप्रिल २०१२१ रोजी चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. त्यात विसुपते हे दोषी असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित असतांना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना लघुसिंचन विभागात प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली. यासंर्दभात काँग्रेसचे अध्यक्ष संजय वराडे यांनी तक्रार केली आहे.
या तक्रारीत संजय वराडे यांनी जितेंद्र विसपुते यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे.