जळगाव । प्रतिनीधी
दिवसेंदिवस जिल्हापरिषदेतील आरोग्य विभागातील अधिकार्यांविषयी सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यात आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या सदस्यांच्या समस्या जाणून घेत नाहीत वेळोवेळी त्यांना ते टाळण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नसल्याचे सदस्य आत्माराम कोळी यांनी मुख्य कार्यकारी यांच्याकडे बोलून दाखवले. तर उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी सध्या आरोग्य विभागाच्या वाढत असलेल्या तक्रारींबाबत डॉ. कमलापूरकर यांना चांगलेच खडसावले व जिप सदस्यांना असलेल्या अडचणींची लवकर उपाययोजना करून त्या सोडवण्याचे आदेश दिले. यावेळी सभागृहात सदस्यांनी आरोग्य विभागाप्रती नाराजी व्यक्त केली.
जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा दि. 25 रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी दोन वाजता बोलवण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम राष्ट्र गाणे सुरुवात करून पुलवामा हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शेतकर्यांसाठी असलेल्या पोखरा (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प ) या योजनेची माहिती देण्यात आली. या योजनेत मराठवाडा, विदर्भ व जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली असून यात 460 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकर्यांना शेडनेट, फळबागा, शेत तळे, यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात आले असून विहीर , बोरवेल,पुनर्भरणासाठी 100 टक्के अनुदान रक्कम देण्यात येणार आहे. तर भूमिहीन नागरिकांसाठी बंदिस्त शेळीपालन, कुकूट पालन, आदी साठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.जिल्हा परिषदेचा छापखाना सुरु करण्यासाठीचा अहवाल अध्यक्षांकडे सादर करण्यात येऊन यावर लवकर काय तो निर्णय घेण्याचे सदस्यांनी अध्यक्षांना सांगितले.छापखाना लवकर सुरु करावयाचा असल्यास त्याचा बजेट सादर कराचा असून यासाठी अगोदर तरतूद होणे गरजेचे असून यावर चर्चा करून लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उज्वला पाटील यांनी सांगितले. यावेळी भूसंपादनाचे 16 कोटी 51 लाख मंजूर केले असूनही शेतकर्यांना हा निधी देण्यात आलेला नाही. असे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले. शाळांचे निर्लेखित करण्याचे ठराव वारंवार करूनदेखील प्रत्यक्षात कृती केली जात नसल्याचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी यांनी यात प्रत्यक्ष कृती केल्या जणांच्या सूचना दिल्या.
सभेत अमळनेर येथील गटविकास अधिकारी कारण न देताच गैरहजर असल्याने त्यांना नोटीस देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सीईओंनी दिले. जीप शाळेतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी मधून लाईटबील भरण्याचे आदेश असून वेळेवर बिले भरण्यास टाळाटाळ करणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार असून शाळेचे बिल हे घरगुती दराने आकारणी करण्यात येणार असल्याचे सीईओंनी सांगितले.
जिल्हापरिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेले गट करा. 62/2 , 64 शिवार मोहाडी व गट करा. 85/47 ,197 शिवार शिरसोली येथील पाझर तलाव साठी कांताबाई जैन फॅमिली नॉलेज इन्स्टिट्यूट अंतर्गत शैक्षणिक व अभ्यासासाठी सदर तलावाच्या देखभाल दुरुस्ती साठी तीस वर्षांच्या कालावधीसाठी करार करणेसंदर्भात विषय क्रमांक 3 याविषयावर सदस्यांनी विरोध केला यावर 20 हजार भाडे घेण्यात येऊन 11 वर्षांचा करार करण्यात यावे असा ठराव करण्यात आला.
आयत्यावेळी आलेल्या विषयात पाचोरा तालुक्यात विहिरींना देऊनही कामास मात्र सुरुवात झालेली नाही तर 243 विहिरींचे अनुदान शेतकर्यांना अजूनपर्यंत मिळाले नसल्याने शेतकर्यांना पंचायतसमितीकडे फिरवाफिरव केले जात असल्यासाचे सदस्य शशिकांत साळुंखे यांनी सांगितले तर अधिकार्यांच्या तू तू मै मै मुले सभागृहाची दिशाभूल केली जात असल्याचे नानाभाऊ महाजन यांनी सांगितले तसेच यावर चौकशी करण्याची मागणी त्यांनी सीईओंकडे केली. यावेळी सीईओंनी याप्रकरणाची चकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
चाळीसगाव तालुक्यातील चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार झाला असल्याचे सदस्य गोपाल चौधरी यांनी तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याची खंत व्यक्त केली यावर सीईओंनी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथे तीव्र पाणीटंचाई असून देखील याठिकाणी टँकर पाठवण्यात येत नसून काही ठिकाणी बोअर करून देखील हात पंप लावण्यात आले नाहीत संबंधित अधिकार्यांना यासंबंधी विचारले असता ते जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने याठिकाणी कामे होत नसल्याचे सांगत असल्याचे सदस्य प्रताप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.
समान निधी वाटपाबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ उडाला. यात अध्यक्षांनी अतिरिक्त निधी जास्त घेतला असून सदस्यांना या निधीबद्दल विश्वासात घेतले नसल्याचे सदस्य जयपाल बोदडे यांनी प्रश्न उपस्थित केला असल्याने अध्यक्षांनी तुम्हाला जे करायचे ते करा असे सांगितल्याने सभागृक्त गोंधळ निर्माण झाला होता.
यावेळी सभागृहात जिप अध्यक्ष उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सीईओ डॉ. बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, भा. शी. आकलाडे, आरोग्य सभापती दिलीप पंत, शिक्षण सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे सर्व विभागाचे अधिकारी गटविकास अधिकारी उपस्थित होते.