शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सार्वे येथे जिल्हा परिषद शाळा दुमजली नवीन इमारत व अंगणवाडी खोली बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सुरूवातीला राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पाहार अर्पण करण्यात आले. शेंदुर्णी नाचनखेडा गट जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरूड यांनी महाराजांचे प्रतिमेचे पूजन केले. यावेळी स्नेहदिप गरूड यांनी सार्वे गावातील नागरिक व लोक प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुमारे पंचवीस लाख रुपये किंमतीच्या प्राथमिक शाळेची दुमजली इमारत व नवीन अंगणवाडी खोलीचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. लवकरच प्रशस्त शाळा व अंगणवाडी इमारती विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील.
जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी संजयराव गरूड यांनी देशाचे भविष्य व भावी पिढी घडणार असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य या इमारती मधून चालणार असल्याने इमारतीचा बांधकाम दर्जा उत्तम राखला जावा यासाठी गावकऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरूड यांचा सत्कार शकुंतला शिंदे, दिपाली शिंदे यांनी तर स्नेहदीप गरूड, विलास अहिरे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, योगेश शिंदे, दीपक पाटील, गणेश शिंदे यांनी केला.
तसेच सदस्य शोयब पटेल यांचा सत्कार चंद्रशेखर पाटील यांनी केला. इमारत भूमिपूजन कार्यक्रमासाठी, शोयब पटेल, डॉ. अशोक पाटील,सुनील पाटील सर, विजय पाटील, मनोज शिंदे, विकास शिंदे, प्रकाश चौधरी, अतुल पाटील, नरेंद्र पाटील, अशोक पाटील व गावकरी मंडळी उपस्थित होती. ठेकेदार गोंडू मोगरे यांनी लवकरात लवकर इमारत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सार्वे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सुरेश पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकात येथील प्राथमिक शाळा इमारत जीर्ण झालेली होती सद्या स्थितित प्राथमिक शाळा श्रीराम मंदिरात भरत असल्याचा उल्लेख केला. नविन शाळा इमारतीची अत्यंत गरज होती नविन इमारतीसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजयदादा गरूड, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरूड यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन दिला व दुमजली इमारत भूमिपूजन सोहळाही संपन्न झाला.
त्यामुळे गावकरी आनंदित झाले आहेत नविन इमारतींना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांचे वतीने नाचन खेडा ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील सर यांनी संजय गरुड, सरोजिनी गरूड यांचे आभार मानले. जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजिनी गरूड यांनी नाचनखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नमन करून पुष्पहार अर्पण केला. येथे आयोजित रक्तदान शिबिरास भेट दिली