जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवाशक्ती फाऊंडेशन व एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ, जळगाव येथे 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मेगा करिअर गाईडन्स सेमिनराचे आयोजन विद्यार्थी हितार्थ विनामूल्य करण्यात आले आहे.
या सेमीनार मध्ये इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सायन्स ॲण्ड हेल्थ सायन्स, बिजनेस ॲण्ड लिडरशिप, आर्टस्, डिझाईन ॲण्ड ह्युमॅनिटीज च्या विविध अभ्यासक्रमांची माहिती एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे च्या ज्येष्ठ व तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सदर सेमिनार सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असून विनामुल्य राहणार आहे.
सदर करिअर गाईडन्स सेमीनार विनामुल्य असून जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत यामध्ये सहभागी होऊन करिअर संधीच्या पर्यायांविषयी सविस्तर माहिती घ्यावी असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.