जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव हे शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात सकाळी 10.30 वा. युवासेना आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे जी. एच. रायसोनी महाविद्यालय येथे उद्घाटन, दुपारी 12.00 वा. शासकीय तंत्रनिकेतन येथे युवासेना कॉलेज कक्ष युनिटचे उद्घाटन, दुपारी 2.00 वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे कुलगूरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा, सायंकाळी 5.30 वा. जिल्हास्तरी बास्केटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण यासह युवासेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा, युवासेना कॉलज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, युवासेना महानगर युवाधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, उप जिल्हायुवाधिकारी विशाल वाणी, हर्षल मुंडे, यश राठोड आदि परिश्रम घेत आहेत.