शिवकॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात तरुणाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी ३० मे रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप जंगी चव्हाण वय-३१, रा. सुभाषवाडी, जळगाव हा तरुण वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. ६ मे रोजी मध्यरात्री २ वाजता तो त्याची दुचाकी (एमएच १९ डीएफ ६३३८ ) शिवकॉलनी स्टॉपजवळ पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीप चव्हाण यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याला दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरुवारी ३० मे रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.

Protected Content