भुसावळ प्रतिनिधी । शहरानजीकच्या वांजोळा रोड परिसरात एका युवकाला पोलिसांनी तलवारसह ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात वांजोळा रोड वरील स्टार लॉन परीसरात सार्व जागी एक इसम हा त्याच्या कबज्यात मानवी जिवीतास घातक तलवार सारखे शस्त्र ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पो.अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, उप.वि.पो.अधिकारी गजानन राठोड,पो.नि. दिलीप भागवत व पो.नि.बाबासाहेब ठोबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सपोनि अनिल मोरे, सहा.फौ तस्लिम पठाण, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ.कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी व गजानन वाघ यांच्या पथकाने या तरूणाला ताब्यात घेतला. याचे नाव आनंद दिनेश खरारे (वय-१८ रा.वाल्मीक नगर गणपती मंदिरा जवळ भुसावळ) असे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी बाजारपेठेत पोलीस स्थानकात ६ गु.र.न २० /२०२० आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना किशोर महाजन करीत आहेत.