अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्दमाने नुकतेच आयोजित आठ दिवसीय विद्यापीठस्तरीय ‘युवती स्वयंसिद्धा अभियान’ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयात करण्यात आले. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे उपस्थित होत्या. स्वयंसिद्धा अभियानाचे प्रशिक्षक राजेंद्र मनोहर जंजाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटना प्रसंगी प्रा. डॉ. शैलेजा माहेश्वरीं, प्रा. डॉ. व्ही. बी. मांटे हे उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. ज्योती राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘विद्यार्थिनींना शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंसिद्ध होण्याची, प्रमाणित करण्याची गरज आहे’ तसेच विद्यापीठाच्या या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या युवती सभा प्रमुख प्रा. नलिनी पाटील यांनी केले व आभार प्रा.योगिनी चौधरी यांनी मानले.
सदर प्रशिक्षण सलग आठ दिवस महाविद्यालयात सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान घेण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. ज्योती राणे तसेच मंचावर प्रा. ललिता पाटील, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा.डॉ.व्ही.बी. मांटे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण समारोप प्रसंगी विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिक करून दाखविले व काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये विविध संकटांवर मात करण्याची उमेद निर्माण झाली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या युवती सभा प्रमुख प्रा. नलिनी पाटील यांनी केले व आभार प्रा.डॉ. मांटे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.