आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीनचे वितरण ( व्हिडीओ )

bharari foundaion

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचा उपक्रम भरारी फाउंडेशन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी व कुटुंबियांना पाच शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

 

वनिता शिंदे वरखेडी ता. पाचोरा, रत्ना पाटील टाकळी ता. धरणगाव, मनिषा पाटील करमाड ता. पारोळा, सोनाली पाटील ता. यावल तसेच वर्धिष्णू फाउंडेशनला कचरा गोळा करणार्‍या महिलांसाठी शिलाई मशीन देण्यात आले. या अभियानासाठी रजनीकांत कोठारी व भालचंद्र पाटील यांनी प्रत्येकी पाच तर डॉ. मनिलाल चौधरी यांनी दोन शिलाई मशीन देण्याचे जाहीर केले. यासाठी उद्योगपती रजनीकांत कोठारी, पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, नरेश खंडेलवाल, स्मिता बाफना, ज्योत्स्ना रायसोनी, उज्ज्वला टाटीया, डॉ. रितेश पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. मनिलाल चौधरी, विनोद ढगे, अद्वैत दंडवते, सुनील जावळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, अक्षय सोनवणे, महेश पाटील, हितेश चौधरी, गोपाळ कापडणे, पियुष मणियार व सचिन महाजन उपस्थित होते.

Add Comment

Protected Content