नगरदेवळा येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी सुवर्णकार बांधवांतर्फे कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मास्क लावून सामाजिक अंतर ठेवत श्री. विठ्ठल मंदीर संस्थान येथे नरेंद्र विसपुते यांनी सपत्नीक नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले. 

आरती होऊन मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाज बांधवांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवाजी भामरे, कृष्णा सोनार, प्रफुल्ल इखणकर, गोलू दुसाने, गजेंद्र बिरारी, मिलींद दुसाने, संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, बबलू विसपुते, देवेश सोनार आदि सह समाज बांधव भगिनी उपस्थित होते.

 

Protected Content